बीड, 18 मार्च : बीडचे भुमिपुत्र आणि सैन्य दलात कार्यरत असलेले सुभेदार अविनाश साबळे यांनी पटियाला येथे राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले आहे. त्यांच्या नेत्रदिपक कामगिरीने बीडसह संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. प्रतिकुल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या उल्लेखनीय यशासाठी अविनाश साबळे यांचे मनपुर्वक अभिनंदन, ऑलम्पिक स्पर्धेत आपण देशाला सुवर्णपदक मिळवून द्याल हा विश्वास असल्याचे सांगत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खा. प्रीतमताईंनी शुभेच्छा दिल्या आहेत.
अविनाश साबळेंच्या नेत्रदिपक कामगिरीने जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली – खा. प्रीतमताई
