बीड, दिनांक 18 मार्च रोजी सकाळी 3.30 वाजता शिरसाळा ते मोहा रोडवर शिरसाळा शिवारात अवैधरित्या विनापरवाना वाळूने भरलेल्या 03 हायवा (भारत बेंझ) पकडण्यात आले आहेत. यामध्ये 3 चालक यांना जागीच पकडण्यात आले आहे,तसेच मालक 3 असे 6 आरोपी यांच्यावर शिरसाळा
पोलीस ठाणे येथे IPC कलम 379,109 तसेच सह कलम 130 (२)/177 मोटार वाहन कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
तसेच सदर गुन्हामध्ये 03 भारत बेंज हायवा व वाळू असे एकूण 72,75000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ही कारवाई एसपी राजा रामा स्वामी यांच्या पथकाचे api विलास हजारे यांनी केली आहे.
वाळू माफियांना एसपिंच्या पथकाचा दणका, तीन हायवा पकड़ले, 72 लाखाचा मुद्देमाल जप्त, सहा जनांवर गुन्हा दाखल
