Site icon लोकाशा-बंब न्यूज

जिल्हा पोलिस प्रशासनाच्या पेट्रोलिंगच्या गाडीचा अपघात, अपघातात सात जण जखमी, सेनेच्या नितिन धांडे यांनी वाचवले जखमींचे प्राण

बीड, बीड जिल्हा पोलिस प्रशासनाच्या पेट्रोलिंग च्या गाडीचा अपघात झाला असून यामधे तीन जण गंभीर जखमी व चार जण जखमी अशी सात जखमी झाले आहेत,
घटनेची माहिती कळताच शिवसेनेचे जिल्हा संघटक नितीन धांडे घटनास्थळी जाऊन स्वतःच्या गाडीमध्ये जिल्हा रुग्णालयात घेऊन आले,
अशोक धांडे एपीआय (57), राजेंद्र शिंदे हेडकॉन्स्टेबल(55), प्रताप घोडके पोलिस ड्रायव्हर वाहन चालक(47),
उमा उद्धव (40 ) महिला, गंभीर जखमी उद्धव, लक्ष्मण मोरे (50), तेजस मोरे(15), आनंद मोरे (25) अशी जखमीची नावे आहेत, या घटनेची

माहिती कळताच घटनास्थळी जाऊन शिवसेनेचे जिल्हा संघटक नितीन भैय्या धांडे स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन आले . त्यांच्यासह

, जयंत वाघ शिवराज धांडे हेमंत वाघ पंकज धांडे श्याम धांडे अजिंक्या धांडे गणेश झुंगुरे यांच्यासह अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत करून बीड जिल्हा रुग्णालय येथे ऍडमिट करून प्राण वाचवले… घटनेची माहिती नितीन धांडे यांनी फोनवरून दिल्या असता तात्काळ जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर गीते सर, सर्जन डॉक्टर सचीन देशमुख, अर्थ डॉक्टर मजित सर जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स नर्स यांनी मोलाची मदत केली…

Exit mobile version