Site icon लोकाशा-बंब न्यूज

एमपीएससीत उत्तीर्ण झालेल्या 413 उमेदवारांना अद्याप नियुक्त्या नाहीत ! उत्तीर्ण उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या द्या, पंकजाताईंनंतर खा. प्रीतमताईंनी एमपीएससीधारकांच्या प्रश्‍नावर आवाज उठविला


बीड, दि. 14 (लोकाशा न्यूज) : प्रश्‍न छोटा असो की मोठा पंकजाताई आणि खा. प्रीतमताई ह्या त्यावर आवाज उठवून तो प्रश्‍न तात्काळ सोडवून घेतात, मागच्या दोन चार दिवसांपुर्वीच एमपीएससीच्या उमेदवारांच्या परिक्षा राज्य सरकारने रद्द केल्या होत्या, यावर आक्रमक होत पंकजाताईंनी राज्य सरकारला थेट खडेबोल सुनावले होते, यामुळे राज्य सरकारला आपला निर्णय बदलून 21 मार्च ही एमपीएससीच्या परीक्षेची तारीख जाहिर करावी लागली, अगदी त्यांच्याप्रमाणेच आता खा. प्रीतमताईंनीही एमपीएससीच्या उत्तीर्ण उमेदवारांच्या प्रश्‍नावर आवाज उठविला आहे. एमपीएससीच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या 413 जणांना तात्काळ नियुक्त्या द्याव्यात, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. त्यांच्या या आवाजामुळे सदर प्रश्‍न नक्कीच सुटेल असा विश्‍वास आता बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील संबंधित उमेदवारांमधून व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या राज्यसेवा परीक्षेच्या अंतिम निकालात 413 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. असे असले तरी या उमेदवारांना अद्याप नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी अधिकारी होण्यासाठी अनेक वर्ष अभ्यास आणि प्रचंड मेहनत केली आहे. यापैकी बहुतांश उमेदवारांची कौटुंबिक पार्श्वभूमी सामान्य आहे. त्यांना आर्थिक, सामाजिक आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे राज्य सरकारने उत्तीर्ण उमेदवारांच्या भवितव्याचा गांभीर्याने विचार करावा व त्यांना तात्काळ नियुक्त्या द्याव्यात, अशी मागणी खा. प्रीतमताईंनी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील संबंधित उमेदवारांना नक्कीच न्याय मिळेल असा विश्‍वास आता व्यक्त केला जात आहे.
Exit mobile version