Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीडमध्ये रॅपीड अन्टीजेन टेस्टला अल्प प्रतिसाद, व्यापाऱ्यानो, टेस्ट करुन घ्या अन्यथा दुकान उघड़ता येणार नाही


बीड, जिल्हाधिकारी , बीड यांच्या आदेशान्वये बीड शहरामध्ये दिनांक १० मार्च २०२१ ते १५ मार्च २०२१ या कालावधीत सर्व व्यापारी व त्यांचे कर्मचारी , दुकानदार , किरकोळ विक्रेते , फिरते विक्रेते ईत्यादी यांची रॅपीड अन्टीजेन चाचणी मोहीम चालु आहे.दिनांक १०/०३/२०२१ रोजी शहरातील ४ केंद्रांवर एकुण ४ ९ ५ चाचण्या झाल्या आहेत . या मोहीमेत दररोज १६०० अॅन्टीजेन चाचण्या होणे आपेक्षीत असताना केवळ ४ ९ ५ चाचण्या होणे हा आरोग्य प्रशासनास मिळालेला अत्यल्प प्रतिसाद आहे . माहे ऑगस्ट , सप्टेंबर २०२० मध्ये अशाच प्रकारे सर्व व्यापारी वर्गाच्या रॅपीड अॅन्टीजेन चाचण्या घेण्यात आल्या होत्या , त्याला बीड शहरातील सर्व व्यापारी व विक्रेते यांनी चांगला प्रतिसाद देऊन आरोग्य विभागास महत्वपुर्ण सहकार्य केले होते . त्यामुळे बीड शहरातील कोविड – १ ९ च्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालणे शक्य झाले होते . सध्या कोविड -१ ९ चा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्यामुळे जिल्हयातील आरोग्य यंत्रणेमार्फत कोविड -१ ९ प्रतिबंधाची कार्यवाही सुरु आहे.त्याचाच एक भाग म्हणुन दिनांक १० मार्च २०२१ ते १५ मार्च २०२१ या कालावधीत बीड शहरातील ४ केंद्रांवर कोविड -१ ९ तपासणी मोहीम आयोजीत केली आहे.सदर मोहीमेस आरोग्य विभागाच्या नियोजनाप्रमाणे बीड शहरातील सर्व व्यापारी , दुकानदार , किरकोळ विक्रेते , फिरते विक्रेते इत्यादी यांनी नेमुन दिलेल्या केंद्रांवर दिलेल्या तारखांना उपस्थित राहुन आपली अॅन्टीजेन चाचणी करुन आरोग्य विभागास सहकार्य करावे.जेणे करुन कोविड -१ ९ च्या प्रसारास काही प्रमाणात आळा घालणे शक्य होईल . दिनांक १५/०३/२०२१ नंतर चाचणी न झालेल्या व्यापारी , विक्रेते यांना मा.जिल्हाधिकारी यांचे वरील आदेशाप्रमाणे दुकान उघडता येणार नाही , व्यवसाय चालु करता येणार नाही याची नोंद घ्यावी, असे सीईओ अजित कुंभार यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

Exit mobile version