Site icon लोकाशा-बंब न्यूज

समग्र शिक्षा योजनेतील विकासकामे तातडीने पूर्ण करा-जि.प.अध्यक्षा शिवकन्या सिरसाट


बीड, दि. 27 (लोकाशा न्यूज) : समग्र शिक्षा अतंर्गत जिल्हयात सुरू असलेली विविध विकास कामे विहित कालावधीत तातडीने पूर्ण करावीत. विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी शाळेला भौतिक सुविधा आणि शैक्षणिक सुविधा देण्यासांठी सर्व संबंधितांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शिवकन्या शिवाजीराव सिरसाट यांनी केले. समग्र शिक्षा विविध उपक्रमाच्या आढावा बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.सिरसाट बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह पंडीत, शिवाजीराव सिरसाट आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

दिनांक 25 फेब्रुवारी 2021 रोजी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत समग्र शिक्षा अभियानातील विविध उपक्रमनिहाय आढावा घेण्यात आला. बीड जिल्हयातील शाळाखोली बांधकाम, स्वच्छतागृह बांधकाम आणि दुरूस्तीबाबात बाबनिहाय चर्चा झाली. सदरील कामे निश्‍चित कालावधीत पूर्ण करण्याचे आदेश अध्यक्षा सौ. शिवकन्या सिरसाट यांनी दिले. जिल्हयातील हंगामी अनिवासी वसतीगृह, मोफत गणवेश, मोफत पाठ्यपुस्तके, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीची साहित्यसाधने, यासह उपक्रमनिहाय खर्चाचे सादरीकरण करण्यात आले. प्रारंभी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी जि.प. अध्यक्षा सौ.शिवकन्या सिरसाट यांचे स्वागत केले. तर जि.प.सदस्य विजयसिंह पंडीत यांचे स्वागत शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी यांनी तर शिवाजीराव सिरसाट यांचे स्वागत शिक्षणाधिकारी (मा.) डॉ.विक्रम सारुक यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक सहाय्यक कार्यक्रम अधिकारी नारायण नागरे यांनी तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी गौतम चोपडे यांनी मानले. यावेळी समग्र शिक्षाचे लेखाधिकारी संजय वायदंडे, सहाय्यक लेखाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, शिक्षण विभागाचे अधिक्षक हिरालाल कराड यांच्यासह जिल्हयातील गटशिक्षणाधिकारी, समग्र शिक्षा अभियानचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Exit mobile version