Site icon लोकाशा-बंब न्यूज

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची बहीण आणि मेव्हुणा तिंतरवणी जवळील अपघातात ठार

तिंतरवणी- कल्याण विशाखा पट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई तालुक्यातील मातोरी- तिंतरवणी जवळ झालेल्या भिषण अपघातात भाजपाचे जेष्ठ नेते तथा माजी अर्थ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची चूलत बहीण आणि मेव्हुणे जागीच ठार झाले आहेत.

जिल्ह्यातील तिंतरवणी-मातोरीच्या दरम्यान बुधवार दि.24 फेब्रवारी रोजी सायंकाळी सुधीर मुनगंटीवार यांच्या चुलत बहीण ममता तगडपल्लेवार आणि मेव्हुणे विलास तगडपल्लेवार हे दोघे पुसद येथून स्वतःच्या वाहनाने पुण्याला मुलाला भेटण्यासाठी निघाले होते. मात्र मातोरी-तिंतरवणी दरम्यान चारचाकी गाडी एम 29 आर 4230 या क्रमांकाची भरधाव वेगात असलेली त्यांची गाडी पुलाखाली जाऊन अपघात झाला. यामध्ये दोघे पती-पत्नी जागीच ठार झाले. चकलांबा पोलीसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.

Exit mobile version