बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : कोरोनाची संख्या पुन्हा वाढत असल्याच्या कारणामुळे जिल्हा प्रशासन चांगलेच सर्तक झाले आहे. या अनुषंगानेच इयत्ता दहावी आणि बारावी वगळून इयत्ता पाचवी ते नववी आणि आकरावीचे वर्ग 10 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. या संदर्भात जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी 24 फेब्रुवारी रोजी आदेश काढले आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी बीड जिल्ह्यात इयत्ता पाचवी ते 12 वीचे वर्ग सर्व नियमांचे पालन करून टप्प्या टप्प्याने सुरक्षितपणे सुरू केलेले आहेत. मात्र सध्यस्थितीत बीड जिल्ह्यात कोवीड 19 बाधित रूग्ण संख्येत वाढ झालेली आहे. तसेच आजपर्यंत काही शाळांमधील 28 शिक्षक, दोन शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सहा विद्यार्थी असे एकूण 36 जण कोवीड पॉझिटीव्ह आढळून आलेले आहेत. कोविड प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व विद्यार्थ्यांचे सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील इयत्ता पाचवी ते इयत्ता नववी व इयत्ता आकरावीचे वर्ग तात्पुरत्या स्वरूपात 10 मार्चपयर्ंत बंद करण्याबाबत विनंती केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जिल्ह्यातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळेतील इयत्ता पाचवी ते नववी, इयत्ता आकरावीचे वर्ग 10 मार्चपर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेश पारीत केले आहेत. दरम्यान बंद कालावधीत सदर विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक ऑनलाईन साधनांचा वापर करून अध्यापनाचे कामकाज सुरू ठेवतील, असेही त्यांनी या आदेशात म्हटले आहे. त्यांच्या या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड सहिता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण तरतूदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
10 वी आणि बारावीचे वर्ग सुरू राहणार