Site icon लोकाशा-बंब न्यूज

कोल्हापुर धनबाद एक्सप्रेस आता परळीमार्गे धावणार, पियुष गोयल यांच्यासह जिल्ह्याच्या खासदार प्रितमताई मुंडे यांचे प्रवाश्यानी मानले आभार


परळी, आज पासुन कोल्हापूर ते धनबाद (बिहार) ही एक्सप्रेस जी अगोदर सातारा-पुणे-नगर-मनमाड औरंगाबाद मार्गे जात होती ती आता कोल्हापूर-पंढरपूर-कूर्डवाडी-उस्मानाबाद-लातूर-परळी वैद्यनाथ-परभणी-नांदेड-किनव-नागपुर-ईटारसी-जबलपूर-(बुध्द धर्मीय तिर्थक्षेत्र) गया,तसेच जैन धर्मीय तिर्थक्षेत्र समेद शिखर (पारस नाथ)व हिंदूचे तिर्थक्षेत्र काशी(दिनदयाळ जंकशन वरुन 20 km) येणे जाणे साठी सोयीचे होणार आहे.
ही ट्रेन सुरू केल्याबदल रेल्वे मंत्री पियुषजी गोयल व बीड जिल्ह्याच्या खासदार तथा भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांचे जाहीर आभार मानले जात आहेत.

Exit mobile version