Site icon लोकाशा-बंब न्यूज

1255 आरोपींचा शोध घेण्यासाठी एसपींनी हाती घेतली विशेष मोहिम, पंधरा दिवसात ‘त्या’ आरोपींना पकडण्याचे आदेश, आरोपीला पकडण्यास मदत करणार्‍या पोलिसांना बक्षीस तर नागरिकांना मिळणार प्रशिस्तीपत्र


बीड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : पाहिजेत, फरारी आणि स्टॅडींग वॉरंटमधील तब्बल 1255 आरोपींच्या शोधासाठी पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे. ही मोहीम पंधरा दिवस राबविण्यात येणार आहे. या अनुषंगानेच आरोपींना पकडणार्‍या पोलिसांना बक्षीस देण्यात येणार आहे. तर आरोपीला पकडण्यासाठी मदत करणार्‍या नागरिकांना प्रशिस्तीपत्र देण्यात येणार आहे.

औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांनी बीड जिल्ह्याच्या वार्षीक तपासाणी वेळी पाहिजे व फरार आरोपी, स्टॅडींग वॉरंट बाबतचा आढावा घेतला होता, पो.स्टे.अभिलेखावर पाहीजे, फरार व स्टँडींग वॉरंटवरील आरोपींची संख्या खुप मोठी असल्याने, आयजींनी सदरची बाब गंभीरतेने घेवून, पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील पाहिजे व फरार आरोपींचा शोधासाठी (15) दिवस विशेष मोहिम राबवून सदरची संख्या 75 % नी कमी करणे बाबत आदेशीत केले आहे. त्यावरुन पोलीस अधीक्षक राजा रामा स्वामी यांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकार्‍यांना आपआपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे बीड जिल्ह्यातील पाहिजे , फरार, स्टॅडींग वॉरट मधील आरोपी पो.स्टे.चे संबंधीत बीट अंमलदार यांचे मार्फतीने स्थानिक पोलीस पाटील यांचे मदतीने पकडणे बाबत आदेश काढले आहेत. ही 15 दिवसांची विशेष मोहिम यशस्वी होण्यासाठी स्था.गु.शा.कडून जिल्हयातील सर्व पो.स्टे . अंतर्गत राहणारे ( 1054 ) पाहीजे, ( 119 ) फरार व स्टॅडींग वॉरंट मधील ( 82 ) आरोपींच्या पो.स्टे.च्या बीट व बीट अंतर्गत गावनिहाय याद्या तयार करुन सर्व पो.स्टे.ला पाठविण्यात आल्या आहेत. सर्व पो.स्टे. प्रभारी अधिकार्‍यांना सदर आरोपींच्या नावाच्या याद्या एका मोठ्या फ्लेक्सवर लावून तो फ्लेक्स पोलीस स्टेशनच्या समोर दर्शनिय भागात लावून फ्लेक्सवर आरोपीचे यादी खाली, यादीतील आरोपी हद्दीत राहत असल्याचे दिसून आल्यास पोलीसांना कळविणे बाबत नागरिकांना आव्हान करुन, त्याखाली संबंधीत पो.स्टे.प्रभारी अधिकारी, नियंत्रण कक्ष बीड, तसेच पो.नि.स्था.गु.शा. यांचे फोन क्रमांक देणे बाबत आदेशीत केले आहे. सदर मोहिमे दरम्यान जास्तीत जास्त आरोपी पकडून त्यांचेकडे तपास करुन पिडीतांना लवकर न्याय मिळावा या उद्देशाने सदरची मोहिम राबविण्यात येत आहे. मोहिमे दरम्यान आरोपी पकडणारे प्रत्येक पोलीस कर्मचार्‍यांना बक्षिस तसेच पकडण्यासाठी माहिती देणारे व मदत करणारे पोलीस पाटील आणि नागरिकांना पोलीस विभागाकडून प्रशस्तीपत्रक दिले जाणार आहे . प्रसारमाध्यमांना याद्वारे विनंती करण्यात येते कि , आपल्या वृत्तपत्रातून नागरिकांना त्यांच्या स्थानिक पोलीस स्टेशनला कामकाजा निमीत्त गेल्यानंतर पोलीस स्टेशन समोर पाहीजे / फरार , स्टैंडींग वॉरंट मधील आरोपींच्या यादीचे फ्लेक्स पाहून त्यामधील आरोपी राहत असल्याचे त्यांच्या निदर्शनाला आल्यास संबंधीत पोलीस स्टेशन तसेच नियंत्रण कक्ष , बीड येथे फोन क्रमांक 02442-222666 / 02442-222333 वर कळवून पोलीस विभागाला सहकार्य करण्याबाबत आवाहन करावे, पोलिस अधीक्षकांनी म्हटले आहे.
Exit mobile version