Site icon लोकाशा-बंब न्यूज

पूजा चव्हाण माझ्या मतदारसंघातील, तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे : पंकजाताई

बीड:  पूजा चव्हाण मुर्त्यु प्रकरणावरुन राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे, आता भाजप नेत्या पंकजाताई मुंडे (Pankaja Munde) यांनीही या प्रकरणावर अक्शन घेतली आहे,  पूजा चव्हाण (Pooja Chavan) ही माझ्या मतदारसंघातील तरुणी आहे. तिच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्काच बसला. तिच्या मृत्यूची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. (Pankaja Munde reaction on Pooja Chavan suicide case)
तत्पूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली. या तरुणीने आत्महत्या करुन 48 तास उलटले तरी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या तरुणीच्या नातेवाईकांनी तक्रार द्यायला हवी, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पण राज्य सरकारला सुमोटो तक्रार दाखल करुन घेता येत नाही का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरूणीचा मृत्यू ही बातमी अतिशय धक्कादायक आहे. हया तरूणीच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे पंकजाताइ मनाल्या आहेत.

Exit mobile version