Site icon लोकाशा-बंब न्यूज

पुजा चव्हाण आत्महत्येशी संबंधीत काही ऑडिओ क्लीप व्हायरल; भाजपा महिला आघाडी आक्रमक, आयुक्तांना निवेदन

बीड,दि.11 ः-पूजा चव्हाणच्या आत्महत्येशी ज्या मंत्र्याचा संबंध जोडला जात आहे, त्याच्या काही कथित ऑडिओ क्लिप सध्या समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्या आहेत. त्यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सूचना करीत असल्याचा संवाद आहे.
कोणत्याही परिस्थितीत लॅपटॉप, मोबाइल ताब्यात घे हे प्रकरण वाढता कामा नये, अशा सूचना त्या संवादात आहेत. या कथित ऑडिओ क्लिप बाहेर कशा आल्या याविषयी देखील उलटसुलट चर्चा आहे. या प्रकरणात आपण अडचणीत येऊ, असे लक्षात आल्याने काही व्यक्तींनी मुद्दाम संवाद रेकॉर्ड करून ठेवले, असे म्हटले जाते. पूजा चव्हाणच्या फेसबुक प्रोफाइलवर एका मंत्र्याचा फोटो होता. त्याअनुषंगानेही सर्वत्र चर्चा होत आहे. आत्महत्येपूर्वी पूजा चव्हाण इस्पितळात दाखल झालेली होती का? असेल तर ती नेमकी कशासाठी दाखल झाली होती याची चौकशी करण्याची मागणीदेखील होत आहे.
परळी तालुक्यातील पुजा चव्हाण या तरूणाीने पुण्यामध्ये स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत राहत असतांना तिने इमारतीच्या मजल्यावरून उडी मारून आत्महात्या केली. त्यानंतर ह्या आत्महत्येशी विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरू झाल्याने भाजपाच्या महिला आघाडी आक्रमक होत. त्या घडनेची चौकशी करून सीबीआय चौकशी करण्यासाठी वानवडी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे. तसेच पुजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंधीत काही ऑडिओ क्लीप देखील सोशल मेडियात व्हायरल झाल्या असल्याची चर्चा होत आहे.
मुळची बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील असलेली 22 वर्षीची पुजा चव्हाण हि शिकण्यासाठी पुण्यात आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री 1 च्या आसपास तिनं सोसायटीच्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसर्‍या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पुजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागल. पण पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही. भाजपकडून आता रितसर तक्रार पुजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणी भाजपच्या महिला नेत्या आणि आघाडी आता आक्रमक झाली आहे. पुजा चव्हाण हिच्या आत्महत्येला कारण ठरलेल्याची चौकशी करावी अशी मागणी वानवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तसं रितसर निवेदनही देण्यात आलं आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनाही चौकशीची मागणी करणारं निवेदन भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अर्चना पाटील यांनी दिलं आहे. पुजा चव्हाणच्या आत्महत्येशी संबंधीत काही ऑडिओ क्लीप देखील सोशल मेडियात व्हायरल झाल्या आहेत. त्या त्याच प्रकरणाशी संबंधीत आहेत का याचा खुलासा पोलीसांनी किंवा पुजाच्या कुटुंबियांनी केलेला नाही. पण त्यात एक व्यक्ती प्रकरण दाबण्यासाठी काही सुचना देत असल्याचं समजून येते. हे संपूर्ण प्रकरण आता तापत चाललं असून, पुणे पोलीसांनी सविस्तर खुलासा करण्याची मागणीही सोशल मीडियात होत आहे.

Exit mobile version