बीड, दि. 10 (लोकाशा न्यूज) : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर. (आबा) पाटील यांच्या नावाने ‘स्मार्ट गाव’ योंजना राबविण्यात येत आहे. तालुकास्तरावर स्मार्ट ठरलेल्या गावाला 20 लाखाचे तर जिल्हास्तरावरील गावाला 60 लाखाचे बक्षीस दिले जात आहे. त्यानुसार बुधवारी जिल्ह्यातील आकरा तालुक्यातील आकरा गावांची ‘स्मार्ट गाव’ म्हणून निवड करण्यात आली आहे. आता जिल्हास्तरावरील स्मार्ट गाव निवडण्यात येणार आहे. त्याअनुषंगानेच आज दि. 11 आणि उद्या दि. 12 फेब्रुवारी रोजी अधिकारी 11 गावांना भेटी देवून जिल्हास्तरावरील स्मार्ट गाव निवडणार आहेत.
गाव स्वच्छ रहावे, गावांचा विकास व्हावा याअनुषंगाने राज्य सरकार आर.आर.पाटील या नावाने स्मार्ट गाव योजना राबवित आहे, सन 2019-20 मधील स्मार्ट गाव निवडण्यासाठीच मागच्या तीन दिवसांपुर्वी तालुकास्तरावरील पथकाने गावागावात जावून पहाणी केली, या पाहणीतून आकरा तालुक्यातील आकरा गावांची स्मार्ट गाव म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये धारूर तालुक्यातील आवरगाव, गेवराई तालुक्यातील किनगाव, शिरूर तालुक्यातील खोकरमोहा, बीड तालुक्यातील ताडसोन्ना, आष्टी तालुक्यातील सराटेवडगाव, वडवणी तालुक्यातील बाहेगव्हाण, अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली, केज तालुक्यातील केवड, माजलगाव तालुक्यातील शेलापुरी आणि परळी तालुक्यातील तपोवन, पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी गावाची निवड करण्यात आली आहे. तर आता या गावातून जिल्हास्तरीय स्मार्ट गाव निवडण्यात येणार आहे. त्याअनुषंगानेच आज आणि उद्या या आकरा गावांना वरिष्ठ अधिकारी भेटी देणार आहेत. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, प्रदिप काकडे, बांधकाम विभागाचे अभियंता हळीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार, वैजिनाथ आवाड, बी.एम.खेडकर हे बीड, गेवराई, शिरूर, बीड, पाटोदा आणि आष्टी या तालुक्यातील गावांना भेटी देणार आहेत. तर ग्रामीण विकास यंत्रणेनेचे प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेडे, ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्ता गिरी, वाघमोडे, जटाळ, साळवे, पिंगळे हे वडवणी, धारूर, अंबाजोगाई, केज, माजलगाव आणि परळी या तालुक्यातील गावांना भेटी देणार आहेत. गावांना भेटी दिल्यानंतर यासंदर्भात 12 फेब्रुवारी रोजी सीईओ अजित कुंभार यांना अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हास्तरावरील स्मार्ट गाव निवडून 16 फेब्रुवारी रोजी स्मार्ट गावांना प्रमाणपत्र वितरीत केले जाणार आहे.
स्मार्ट गावची प्रक्रिया यशस्वी करण्यास ग्राम
पंचायत विभागाचे तगडे नियोजन कामी आले
स्मार्ट गाव निवडण्यात सर्वात महत्वाची जबाबदारी जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग पार पाडत आहे. या विभागाने सुरूवातीला तालुकास्तरावरील स्मार्ट गावाची सगळी प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे, अगदी यानुसारच आता जिल्हास्तरावरील स्मार्ट गावाची प्रक्रियाही पार पडणार आहे. ही सर्व प्रक्रिया यशस्वी होण्यामागे जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभाग आणि या विभागाचे प्रमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्ता गिरी यांची मेहनत कामी आली आहे.
तालुकस्तरावरील स्मार्ट ग्राम
क्र. तालुका गाव
1) बीड – ताडसोन्ना
2) धारूर -आवरगाव
3) गेवराई – किनगाव
4) शिरूर – खोकरमोहा
5) आष्टी – सराटेवडगाव
6) वडवणी – बाहेगव्हाण
7) अंबाजोगाई – गिरवली
8) केज – केवड
9) माजलगाव – शेलापुरी
10) परळी – तपोवन