Site icon लोकाशा-बंब न्यूज

नरेंद्र मोदींनी लोकनेत्याच्या ड्रीम प्रोजेक्टला तारले ! खा. प्रीतमताईंच्या लढ्याला मोठे यश, नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्राने मंजूर केले 527 कोटी 63 लाख 88 हजार रुपये


दिल्ली, दि. 9 (लोकाशा न्यूज) : देशाचे कणखर पंतप्रधान नरेद्र मोदींनी नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाकडे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पाहिलेले आहे. या अनुषंगानेच मोदींनी या मार्गाकडे स्वत: लक्ष घातलेले आहे. सध्या या मार्गाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले असले तरी एकट्या मोदी सरकारने बीडकरांच्या जिव्हाळ्याच्या आणि मुंडे साहेबांच्या स्वप्नातल्या या प्रोजेक्टला मोदींनी तारण्याचे मोठे काम केले आहे, हा मार्ग जलदगतीने पुर्ण व्हावा यासाठी राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात खा. प्रीतमताई धडाडीने काम करीत आहेत. त्यांचा हाच धडाडीपणा पाहूण केंद्राने या रेल्वे मार्गाला तब्बल 527 कोटी 63 लाख 88 हजार रूपये मंजूर केले आहे. एवढा निधी मंजूर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री, पंकजाताईंसह खा. प्रीतमताईंचे जिल्हावासियांमधून आभार मानले जात आहेत.
नगर बीड परळी रेल्वे मार्गाचे काम गतीने पुर्ण व्हावे, यासाठी लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडेंनी सातत्याने प्रयत्न केले, त्यांच्यानंतर हा प्रोजेक्ट त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाती घेतलेला आहे. त्यानुसार मोदींकडून या मार्गासाठी निधीचा वर्षाव सुरू आहे. मागच्या पाच वर्षांपुर्वी राज्यातही भाजप सेनेचे सरकार होते, आपल्या सरकारच्या काळात राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनीही केंद्र देईल तेवढा निधी या रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारकडून खेचून आणला, मात्र राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर आता राज्य सरकारकडून या मार्गाला हवा तसा आणि वेळेवर निधी मिळेना झाला आहे. असे असले तरी पंकजाताईंच्या नेतृत्वात खा. प्रीतमताईंनी या रेल्वे मार्गासाठी आपला लढा कायम सुरू ठेवला आहे. त्यांनी या मार्गाच्या निधीसाठी सातत्याने राज्य सरकारला धारेवर धरले तर राज्य सरकार निधी देत नसेल तर केंद्राने निधी कमी पडू देवू नये, अशी मागणी आपल्या सरकारकडे सातत्याने लावून धरली, त्यांच्या याच पाठपुराव्याला आणि लढ्याला पुन्हा एखदा पंतप्रधान नरेंद्र मोदींसह रेल्वे मंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. कारण या रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारने तब्बल 527 कोटी 63 लाख 88 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पाबरोबरच रेल्वेच्या विद्युतीकरणासाठी भरीव निधी मंजूर केला आहे. यामध्ये नगर बीड परळी रेल्वे मार्गाबरोबरच नांदेड-यवतमाळ-वर्धा नवीन रेल्वेमार्गासाठी ह्या वर्षी 347 कोटी रुपये मंजूर केले आहेत. मराठवाड्यातील दुसर्‍या रेल्वेमार्ग दुहेरीकरणाला मंजूरी देण्यात आली आहे. तसेच अकोला-हिंगोली-पूर्णा-मुदखेड-धर्माबाद-मेडचल रेल्वेमार्ग दुहेरीकरणाला 5 कोटी रुपये मंजूर करून पिंक बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे. ंर्मनमाड-नांदेड-धर्माबाद-मेडचल रेल्वेमार्ग विद्युतीकरणासाठी 175 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अकोला-हिंगोली-पूर्णा रेल्वेमार्ग विद्युतीकरणासाठी 90 कोटी रुपये, मिरज-कुर्डुवाडी-लातूर मार्गच्या विद्युकरणसाठी 40 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दोन वर्षापूर्वी मंजूर केलेल्या नांदेड – बिदर व्हाया औराद मार्गाच्या कामाला आणखी गती मिळावी म्हणून 1 हजार कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आलेली आहे. या प्रकल्पाला यापुर्वी 2100 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. यावरून मोदी सरकार विकासकरणात राज्यापेक्षा दहा पाऊल पुढे असल्याचे दिसून येत आहे.

केंद्राने परळीकडेही वेधले लक्ष
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात बीड जिल्ह्यासह परळीकडे आपले लक्ष वेधले आहे. रेल्वे मार्गाबरोबरच केंद्राने मुदखेड-आदीलाबाद- पिंपळखुटी आणि परभणी-परळी वैजनाथ विद्युतीकरणासाठी 100 कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्याचप्रमाणे विक्रबाद-बिदर-परळी वैजनाथ या मार्गाच्या विद्युतीकरणासाठीही 90 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

मराठवाड्यातील दुसर्‍या रेल्वेमार्ग
दुहेरीकरणालाही दिली मंजूरी

देशाच्या वैभवात भर पडेल असे काम खर्‍या अर्थाने आज मोदी सरकार करत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामातून याच सरकारने प्रत्येक जिल्हा देशाला जोडण्याचे काम केले आहे, अगदी अशाच प्रकारचे काम रेल्वे मार्गातूनही मोदी सरकार धडाडीने करत आहे. कालच्या अर्थसंकल्पात मराठवाड्यातील दुसर्‍या रेल्वेमार्ग दुहेरीकरणालाही केंद्राने मंजूरी दिली आहे.

Exit mobile version