बीड, दि. 1 (लोकाशा न्यूज) : पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी यांच्या विशेष पथकाने आष्टी परिसरात मोठी कारवाई केली आहे. याठिकाणी एसपींच्या विशेष पथकाचे प्रमुख एपीआय विलास हजारे यांनी अवैध वाळू उपसा करताना दोन जेसीबीसह चार ट्रक्टर पकडले आहेत. या कारवाईत जवळपास साठ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. दरम्यान एसपींच्या नेतृत्वात एपीआय विलास हजारे यांनी केलेली ही कारवाई माफियांना मोठा दणका तर सर्व सामान्यांना दिलासा देणार असल्याचे बोलले जात आहे.
एसपींच्या विशेेष पथकाची आष्टीत मोठी कारवाई; अवैध वाळू उपसा करताना दोन जेसीबीसह चार ट्रक्टर पकडले, 60 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त
