Site icon लोकाशा-बंब न्यूज

खा. प्रीतमताईंनी केलेल्या विकास कामांचा गल्लीपासून दिल्लीपर्यंत डंका ! पार्लियामेंट्री बिजनेस कमिटीचा सर्वे आला, पहिल्या टॉप टेनच्या यादीत ताईंनी मिळविले पाचवे स्थान


बीड,दि.29 (लोकाशा न्यूज) : सलग दोन वेळेस बीड जिल्ह्याचे संसदेत प्रतिनिधित्व करणार्‍या खा. डॉ. प्रितमताई मुंडे या विकास कामात टॉप टेन मध्ये पाचव्या स्थानी असल्याचे पार्लियामेंट्री बिजनेस कमिटीच्या सर्वेमधून पुढे आले आहे. आपल्या कामातून नागरिकांचे प्रश्‍न तडीस लावणार्‍या या लोकनेत्यावर आता बीडसह संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

डॉ.प्रितमताई मुंडे ह्या सलग दुसर्‍यांदा संसदेत बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहेत. आधी लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे आणि आता लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात त्या सामाजिक आणि राजकिय धडे गिरवित आहेत. 80 टक्के समाजकारण आणि 20 राजकारण हे सुत्र आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्या खर्‍या अर्थाने काम करत आहेत. खासदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांनी जिल्ह्यातील अनेक महत्वाचे प्रश्‍न मार्गी लावले, संपूर्ण बीड जिल्हा महामार्गांच्या माध्यमातून देशाला जोडण्याचे काम त्यांनी खर्‍या अर्थाने केले, जिल्हावासियांच्या जिव्हाळ्याचा असलेला नगर-बीड-परळी रेल्वे मार्गालाही त्यांच्याच काळात खर्‍या अर्थाने गती मिळाली, सध्याही त्यांच्याच प्रयत्नाने या रेल्वे मार्गाला केंद्रातून कोट्यावधींचा निधी मिळत आहे. थोडाही स्वार्थ न ठेवता त्या बीड जिल्ह्यातील जनतेचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी काम करत आहेत. स्वत: डॉक्टर असल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्याचे प्रश्‍नही त्यांनी सातत्याने सोडविले आणि येणार्‍या काळातही त्या नक्कीच सोडविणार आहेत. त्यांच्या कार्यकाळात केंद्रातून विकास कामांसाठी सर्वाधिक निधी बीड जिल्ह्यासाठी मिळालेला आहे. जिल्ह्यातील नागरिकांचा प्रश्‍न छोटा असो की मोठा तो सोडविण्यासाठी त्या नेहमीच तत्पर असतात, मग आपण सत्तेत असो की विरोधात याचा थोडाही विचार न करता त्या सर्व सामान्यांच्या प्रश्‍नांसाठी धडाडीने काम करताना त्या दिसून येत आहेत. जिल्ह्यातील नागरिकांच्या, शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर त्यांनी संसदेत आवाज उठवून ते प्रश्‍न सोडविण्यास सरकारला भाग पाडलेले आहे. महत्वाचे प्रश्‍न तात्काळ मार्गी लागत असल्यामुळे बीड जिल्ह्याबरोबरच संपूर्ण राज्यभरात त्यांची लोकप्रियता वाढू लागली आहे. उत्कृष्ट नैतिकतेच्या दृष्टीने ही त्या अव्वल स्थानी असल्याचे या सर्वेत नमूद करण्यात आले आहे. वास्तविक पाहता आपण निवडून दिलेला खासदार हा आपल्या मतदार संघासाठी नेमके काय करतो, याची माहिती मतदारांना होणे गरजेचे असल्याने पार्लियामेंट्री बिजनेस कमिटीच्यावतीने सर्वे केला जातो, आणि याच सर्वेच्या माध्यमातून डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवल्याचे समोर आले आहे. या सर्वेत त्यांनी पाचवे स्थान (4.90) पटकावले असल्याने बीड जिल्ह्यासाठी ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. याबद्दल त्यांचे बीडसह संपूर्ण राज्यभरातून अभिनंदन केले जात आहे.
Exit mobile version