Site icon लोकाशा-बंब न्यूज

पंकजाताई मुंडे यांच्या मध्यस्थीनंतर हिवरा येथील शेतकऱ्यांचे उपोषण मागे,रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी सुरू होते उपोषण

परळी । दिनांक २७ ।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर मौजे हिवरा येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण आज मागे घेतले.

परळी तालुक्यातील मौजे हिवरा ते पारगाव या गट नंबर १७ मधील रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढावे या मागणीसाठी तेथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर दोन दिवसांपासून सुरू केले होते. पंकजाताई मुंडे यांनी आज उपोषण कर्त्यांची भेट घेऊन त्यांची समस्या ऐकून घेतली आणि महसूलच्या अधिका-यांना या प्रकरणात अतिक्रमण करणा-या विरुध्द तात्काळ कारवाई करण्यास सूचित केले. उप विभागीय अधिकारी नम्रता चाटे व नायब तहसीलदार बाबूराव रूपनर यांच्या आश्वासनानंतर आणि पंकजाताई मुंडे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर शेतकऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले.

भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, हिवरा येथील भाजपा नेते वृक्षराज निर्मळ, बंडू निर्मळ, उपोषण कर्ते शेतकरी रघवीर रासवे, ज्ञानेश्वर म्हेत्रे, सुदाम रासवे, भगवान रासवे, तात्यासाहेब घोडके आदी यावेळी उपस्थित होते.
••••

Exit mobile version