Site icon लोकाशा-बंब न्यूज

कोणी कितीही मोठ्या बापाचा असू द्या, सोडणार नाही, अजित पवारांनी सावकारांना भरला दम


बारामती, दि. 25 जानेवारी : खासगी सावकारकीच्या माध्यमातून कोणी गोरगरिबांना लुटत असेल तर त्याच्यावर तडीपार, मोका सारखी कारवाई करेन, कोणी कितीही मोठ्या बापाचा असूद्या, कारवाईनंतर कुठला मायचा लाल चुकलं म्हणून माझ्याकडे आला तरी सोडणार नाही, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासगी सावकारांना भरला.
बारामती येथील जिजाऊ भवन येथे बारामती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक श्रीनिवास बहूळकर यांच्या सेवापूर्तीनिमित्त सन्मान करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले, मधल्या काळामध्ये खासगी सावकारीची प्रकरणे व त्यामधून झालेल्या आत्महत्या माझ्या कानी आल्या होत्या. नियमबाह्य व कायदे मोडून व्यावसाय करण्यापेक्षा चांगले व्यावसाय करा. अशा धंद्यांपासून बाजूला रहा. दादागिरी, मनगटशाहीच्या जोरावर कोणी सर्वसामान्य माणसाला लुटत असेल, तर त्याच्यावर कायद्याने जेवढी कडक कारवाई करात येईल तेवढी कडक कारवाई करण्यात येईल. मग तो कोणी का असेना माफी मागत अला तरी त्याला माफ करणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहर व तालुक्यातील खासगी सावकारांना गर्भित इशारा दिला. तत्पूर्वी बारामती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक श्रीनिवास बहुळकर यांना सेवापूर्तीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.

Exit mobile version