Site icon लोकाशा-बंब न्यूज

पत्नीस मारहाण करणार्‍या ‘त्या’डॉक्टर पतीसह सहा जणांवर 307 चा गुन्हा दाखल


बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : दुसरी मुलगी झाली या कारणावरून पतीने पत्नीस बेदमपणे मारहाण करत अंगावर रॉकेल ओतून तिला जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब रोडवर असलेल्या विठ्ठलनगर भागात घडली. जखमी महिलेवर बीडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी पहाटे दोन वाजता या प्रकरणी पतीसह सहा लोकांविरोधात कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रियंका विशाल घुगे या महिलेचे गेल्या काही वर्षांपुर्वी कळंब येथील विशाल घुगे याच्याशी लग्न झाले. या महिलेला दोन मुली आहेत. दुसरीही मुलगीच झाली म्हणून सदरील महिलेस पती विशाल घुगे याने बेदमपणे मारहाण करत तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. यातून महिलेने आपली कशीबशी सुटका करून बीड गाठले. या कामी विशाल घुगे याला त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी मदत केली. जखमी महिलेवर बीडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिलेची फिर्याद नोंदवून घेण्यासाठी कळंबचे पोलिस शनिवारी बीड येथे आले होते. महिलेने आपला जवाब पोलिसांकडे नोंदवला. त्यानुसार आरोपी विशाल घुगे, काशीबाई सांगळे, प्रकाश सांगळे, विजयमाला गिते, कोमल संतोष वाघमारे, अक्षय गिते यांच्या विरोधात कलम 307, 498 (अ), 324, 109, 506 भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Exit mobile version