बीड, दि. १९ (लोकाशा न्यूज) : बीडचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांची अखेर बदली करण्यात आली असून येथे सध्या औरंगाबादला सहायक विक्रीकर आयूक्त म्हणून कार्यरत असलेले आर.एस. जगताप हे बीडचे जिल्हाधिकारी म्हणून येणार आहेत.
बीडचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या बदलीच्या चर्चा अनेक दिवसांपासून होत्या. ग्रामपंचायत निवडणूकीची आचारसंहिता शिथील होताच त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. रेखावार यांना मुंबई येथे पाठवण्यात आले असून आर.एस. जगताप हे बीडचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. जगताप यांनी यापूर्वी बीड जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे.