Site icon लोकाशा-बंब न्यूज

ग्राम पंचायत निवडणुकीत आ.संदिप क्षीरसागरांचा बोलबाला, 18 ग्रा. पं. वर झेंडा

बीड (प्रतिनिधी):- तालुक्यातील 29 ग्रामपंचायतपैकी 24 ग्रामपंचायतीचा निकाल लागला असून 12 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला असून 3 ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या बिनविरोध ताब्यात आलेल्या आहेत. अशा एकूण बीड तालुक्यातील 15 ग्रामपंचायती तर बीड मतदार संघातील शिरूर कासार तालुक्यातील एकूण 6 पैकी 3 ग्रामपंचायतीवर आ.संदिप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली एकूण 18 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. सर्व विरोधक एकत्र येवून अभद्र युती करत आ.संदिप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलला टक्कर देत होते. परंतू ग्रामीण भागातील जनतेने आ.संदिप क्षीरसागर यांच्या बाजुने आपल्या मतांचा कौल देत ग्रामीण भागातील जनता सोबत असल्याचे दाखवून दिले. विरोधकांनी प्रचंड धनशक्तीचा वापर केला असला तरी आ.संदिप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.पुरस्कृत पॅनलचा विजय म्हणजे धनशक्ती विरूद्ध जनशक्तीचा विजय म्हणता येईल अशा प्रतिक्रिया नवनिर्वाचित ग्रा.पं.सदस्यांनी दिल्या आहे. 

बीड तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीपैकी 5 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. यातील काटवटवाडी, मौज/ब्रह्मगाव, मौजवाडी या तीन ग्रामपंचायती रा.काँ.च्या बिनविरोध ताब्यात आलेल्या आहेत. तर अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी बहिरवाडी, आनंदवाडी, पिंपळगाव मोची, कळसंबर, कारळवाडी/निर्मळवाडी, पिंपळगाव मंझरा, नागझरी/मान्याचावाडा, गुंधा, भंडारवाडी, गुंधावाडी, नागापुर (बु.), कदमवाडी या ग्रामपंचायती आ.संदिप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहे. तसेच बीड मतदार संघातील शिरूर कासार तालुक्यातील वंजारवाडी/येवलवाडी,भानकवाडी, खरगवाडी/टाकळवाडी/धनगरवाडी या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. धनशक्ती विरूद्ध जनशक्तीचा विजय असून ग्रामीण भागातील जनतेचा कौल आ.संदिप क्षीरसागरांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले आहे. आ.संदिप क्षीरसागर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड.डी.बी.बागल, माजी आ.सय्यद सलीम व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आनंदवाडी येथील पंचायत समिती सदस्य मोहन देवकते, संतोष खरसाडे, बालाजी पवार, सुनिल खटाळ, कारळवाडी, निर्मळवाडी येथील शिवकन्या हुबे, वर्षा वाणी, कुसूम निर्मळ, रामदास खरात, कदमवाडी येथील श्यामराव तुपे, महादेव उबाळे, राम सापटे, राहुल कदम, देविदास वाघ, कदम जगदीश, बाबू कदम, सुग्रीव डोके, बहिरवाडी येथील बाजीराव बोबडे, बबनराव डोईफोडे, अशोकराव बोबडे, दिपक कुलकर्णी, रमेशराव मदने, जितेंद्र बोबडे, पप्पू तावरे, समाधान शेलार, खंडु चादर, शिवकुमार गायकवाड, दिपक पाडुळे, कळसंबर (व.) येथील हनुमंत वाघमारे, नंदकुमार धन्वे, बाळासाहेब वाघमारे, ईश्वर वाघमारे, योगेश चिंचकर, बाबुराव पालक, भंडारवाडी येथील लालासाहेब सालगुडे, अशोक सालगुडे, गोरख सालगुडे, बंडु जाधव, बाळू जुळे, मच्छिंद्र सालगुडे, नागापुर बु. येथील पॅनल प्रमुख शंकर टेकाळे सर व इतर नागझरी, मान्याचावाडा येथील योगेशराव चव्हाण, योगेश आव्हाड, महादेव नहिराळे, लहु येळवे, सतिष कळसुळे, ज्योतीराम नहिराळे, विलास येळवे, पिंपळगाव मोची कल्याण आखाडे, विश्वासराव आखाडे, सिताराम आखाडे, बाबुराव कोरडे, रामनाथ आखाडे, सर्फराज सय्यद, भूषण कोरडे, भैय्यासाहेब कोरडे, पिंपळगाव मंझरा येथील राजेंद्र खांडे, राजु खांडे, श्रीकिसन खांडे, रमेश पडघन, रविंद्र डुकरे, नवनाथ खांडे, भागवत खांडे, मुकुंद खांडे, सुमंत खांडे, गुंधा येथील नंदकिशोर मोरे, शेख जैदाबी बाबालाल, अंधारे सतिष, सुदर्शन मोरे, मोरे मुक्ताबाई सुर्यकांत, उनवणे सारिका रावसाहेब, शिंदे जयश्री सुनिल व गुंधावाडी येथील व इतर ठिकाणचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होतेे.

Exit mobile version