राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. या सर्व ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी होते आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. राज्यातील पहिला निकाल सकाळी पावणे नऊच्या सुमारास जाहीर झाला. यवतमाळ- स्व. वसंतराव नाईक आणि स्व. सुधाकरराव नाईक या महाराष्ट्राच्या दोन मुख्यमंत्र्यांचे गाव, १९४९ पासून बिनविरोध असलेल्या गहुली या गावी प्रथमच होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपने ७ पैकी ७ जागा जिंकल्या, गहुली ग्रामपंचायत आमदार निलय नाईक यांच्या ताब्यात आली आहे.