कल्याण तालुक्यातील खडवली ग्रामपंचायतीमध्ये एका प्रभागात भाची विरुद्ध मामी अशी लढत होती. या निवडणुकीत मामीला पराभूत करून भाची प्रियंका राजेश भोईर यांनी विजय मिळवला.
धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनेक चुरशीच्या लढती होत्या परंतु शिरपूर तालुक्यातील दहिवद येथे सासू आणि सून यांच्यात लढत पाहायला मिळाली. एकूणच तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांना या निकालाची उत्सुकता होती. आज निकाल लागल्यानंतर स्मिता चव्हाण सासूचा विजय झाला असून, त्यांना एकूण 286 मतं मिळाली आहेत. सून सुनंदा चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला. त्यांना 285 इतकी मतं पडली आहेत.
धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातील दहिवद इथेच दोन जाऊबाईंमध्ये लढत होती. आशा रवींद्र पाटील या मोठ्या जाऊचा विजय झाला असून
त्यांना एकूण 364 मत मिळाली आहेत. वृषाली पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यांना 267 इतकी मतं पडली आहेत.
नांदेड : ग्रामपंचायत निवडणुकीत सासूबाईंनी सूनबाईंना पराभवाची धूळ चारली. सासू-सुनेच्या लढाईत सासूबाई रेखा दादजवार यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे सासूबाई अवघ्या चार मतांनी वरचढ ठरल्या. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील दाभड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सासू-सून एकमेकींच्या विरोधात उभ्या ठाकल्या होत्या.