Site icon लोकाशा-बंब न्यूज

अंगावर रॉकेल ओतून पत्नीस जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीस 2 वर्ष सक्त कारावास, अपर सत्र न्यायाधीश यु.टी. पौळ यांचा निकाल


बीड, दि. 16 (लोकाशा न्यूज) : अंगावर रॉकेल ओतून पत्नीस जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीस दोन वर्ष सक्त कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हा निकाल शनिवारी येथील अपर सत्र न्यायाधीश यु.टी. पौळ यांनी दिला आहे.

येथील अपर सत्र न्यायालय 1 ले श्री.यु.टी. पौळ यांनी आरोपी क्र.1 विकास बाबासाहेब खेडकर, आरोपी क्र 2 बाबसाहेब यशवंत खेडकर (सासरा) , आरोपी क्र .3 सुनिता बाबासाहेब खेडकर (सासु) सर्व रा.घाटशिळ पारगाव यांना फिर्यादी नामे वैशाली विकास खेडकर (रा.घाटशिळ पारगाव ता.शिरूर) हिस लाथा बुक्कयाने मारहाण व शिवीगाळ करून तिच्यावर रॉकेल ओतून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी धरून 2 वर्ष सक्त कारावासची शिक्षा व प्रत्येकी 500 / – रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे . प्रकरणातील थोडक्यात हकीकत अशी की , दिनांक 11 जून 2015 रोजी उंबरमुळी ता.शिरूर येथे फिर्यादी वैशाली विकास खेडकर हिचा घाटशिळ घारगाव ता.शिरूर येथील विकास बाबासाहेब खेडकर यासोबत रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता , परंतु लग्नानंतर सहा महिन्याने विकास व त्याचे आई वडीलांनी फिर्यादीस माहेरून चारचाकी गाडी घेण्यासाठी तीन लाख रूपये का देत नाही म्हणून दिनांक 20/04/2017 रोजी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास राहत्या घरी आरोपी विकास व त्याचे आई वडील यांनी मिळून फिर्यादीस लाथा बुक्कयाने मारहाण व शिवीगाळ करून तिच्यावर रॉकेल ओतून जिवे मारण्याचा प्रयत्न केला . सदरच्या फिर्यादीने दिलेल्या जबाबावरून पोलीस ठाणे शिरूर येथे गु.र.नं .116 / 2017 कलम 498 ( अ ) , 307,323,504,34 भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा नोंद होवून गुन्ह्याचा तपास पोउनि एम.आर.काझी यांनी केला . तपासीक अधिकारी यांनी आरोपीताविरूध्द सबळ पुरावे गोळा करून गुन्ह्याच्या तपासांती मुदतीत अंतीम दोषारोपपत्र मा . न्यायालयास सादर केले होते . सदर प्रकरणातील सुनावणी बीड येथील मा.अपर सत्र न्यायालय 1 ले श्री.यु.टी.पीळ यांच्या न्यायालयात झाली . सुनावणीअंती मा.न्यायालयाने कलम 498 ( अ ) भादंवि मध्ये दोषी ठरवून 2 वर्ष सक्त कारावास व प्रत्येकी 500 / – रूपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली . प्रकरणात सरकारी पक्षाची बाजु जिल्हा सरकारी वकील श्रीमती एम . एम.दराडे यांनी मांडली व सरकार पक्षाची बाजू मजबूत करण्यासाठी पोह / 657 एस.आर.डोंगरे यांनी पैरवीचे कामकाज पाहिले.
Exit mobile version