Site icon लोकाशा-बंब न्यूज

धनंजय मुंडे यांचे मंत्रीपद राहणार कायम; राष्ट्रवादी काँग्रेस मुंडेंच्या पाठीशी !

बलात्काराच्या आरोपावरून अडचणीत आलेले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा असल्याचं दिसून येत आहे .प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करीत राजीनामा घेण्याची गरज नाही,पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतर निर्णय घेऊ असे म्हटले आहे,त्यामुळे पक्ष मुंडे यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट झाले आहे .
गायिका असलेल्या एका महिलेने मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती .फोन दिवसापासून या प्रकरणी राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे .अशावेळी सकाळी शरद पवार यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटल्याने मुंडे यांना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात होती . दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यात एक तास बैठक झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी पोलिसांचा निष्कर्ष आल्याशिवाय काही होणार नाही,संबंधित महिला मुंडे यांना ब्लॅकमेल करत होती त्याबाबत मुंडे यांनी पोलिसात तक्रार दिली होती ,त्यावर योग्यवेळी कारवाई झाली नसल्याचे सांगत मुंडे यांचा राजीनामा घेण्याची गरज नसल्याचे पाटील यांनी सांगितले .

Exit mobile version