मुंबई, 14 जानेवारी : ड्रग्ज प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या समीर खान याच्या घरावर एनसीबीने छापा टाकला आहे. समीर खान याच्या वांद्र्यातल्या घरी एनसीबीची टीम पोहोचली आहे, तिकडे सर्च ऑपरेशन सुरू आहे. करण सजनानी आणि समीर खान यांच्यात ड्रग्ज सप्लायबाबतचं चॅट आणि पैशांच्या देवाणघेवाणीचे पुरावे मिळाल्यानंतर एनसीबी ही छापेमारी करत आहे. दुसरीकडे एनसीबीची लखनऊची टीम रामपूरमध्येही गेली आहे. मुंबईत दाखल झालेल्या गुन्ह्यात रामपूर कनेक्शन समोर आल्यानंतर लखनऊ टीम धाडी टाकण्यासाठी रामपूरला गेली. एनसीबी लखनऊचे डीएसपी विशाल पवार आणि एनसीबीचे इन्सपेक्टर राजकुमार शाह, सब इन्सपेक्टर सुनील चौधरी यांच्या टीमने या धाडी टाकल्या. पीला तालाब चौकी जवळ सय्यद अन्वर याच्या घरावर ही धाड टाकण्यात आली. यानंतर एनसीबीला आपत्तीजनक वस्तू मिळाल्या नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोण आहे समीर खान?