Site icon लोकाशा-बंब न्यूज

ड्रग्ज प्रकरण : कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान अटकेत

.

मुंबई, 13 जानेवारी : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) याच्या आत्महत्येनंतर NCB ने मुंबईतील अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांभोवती फास आवळण्यास सुरुवात केली आहे. याच प्रकरणात आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab malik) यांचा जावई समीर खान (samir khan) याला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे.
ड्रग्ज प्रकरणात जावयाला अटक करण्यात आल्यामुळे नवाब मलिक यांच्यासमोरच्याही अडचणी वाढल्याचं बोललं जात आहे. समीर खान याला एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला अटकही करण्यात आली. दरम्यान, अंमली पदार्थ प्रकरणी फक्त बॉलिवूडच नाही तर उद्योगपती आणि श्रीमंतांची नावे देखील समोर आली आहेत. कोट्यधीश बिल्डर अशी ओळख असणाऱ्या करन सजनानी याला एनसीबीने बेड्या ठोकल्या. या करन सजनानी याच्या अटकेनंतरच विविध नावं समोर येऊ लागली. आधी मुच्छड पानवाला याचं नाव समोर आलं आणि आता समीर खान यालाही एनसीबीने अटक केली.
गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या तपासामध्ये आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींची चौकशी केली जात होती. मुंबईतील प्रसिद्ध पानवाला अशी ओळख असणारा मुच्छड पानवाला त्याचे पान फक्त मुंबईतच नाही तर जगातल्या अनेक ठिकाणी मागवले जातात. हायप्रोफाईल बिजनेसमॅनपासून बॉलिवूडच्या सेलिब्रेटीपर्यंत मोठा ग्राहकवर्ग असणाऱ्या मुच्छड पानवालाची एनसीबी ड्रग्स प्रकरणात चौकशी करणार आहे .

Exit mobile version