Site icon लोकाशा-बंब न्यूज

बीड जिल्ह्याला मिळाले 17640 कोविशिल्ड लसीचे डोस, जिल्हाधिकारी राहूल रेखावार आणि जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांची माहिती


बीड, दि. 13 : अखेर जी लस येण्याची प्रतिक्षा होती ती बुधवारी पुर्ण झाली, पहिल्या टप्प्यात दिली जाणारी लस बीड जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील 17640 इतके डोस प्राप्त झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राहूल रेखावार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांनी दिली आहे. त्यानुसार 16 जानेवारीपासून आता सहा ठिकाणी लसीकरण होणार आहे.
बीड जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचार्‍यांना लसीकरण करण्यासाठी जवळपास साडे सतरा हजार कोव्हीड लसीची मागणी जिल्हा आरोग्य विभागाने सरकारकडे नोंदविली होती, त्यानुसार बीड जिल्ह्यासाठी कोव्हीड लसचे 17640 डोस उपलब्ध झाले आहेत. बुधवारी औरंगाबाद विभागासाठी देण्यात येणार्‍या कोव्हीड लसीचे अगमन औरंगाबाद या ठिकाणी झाले आहे, लस उपलब्ध झाल्यानंतर पुढचे नियोजन स्पष्ट होईल असे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी म्हटले आहे.

Exit mobile version