बीड दि.11: दगडाने ठेचून एका तरुणाचा खून केल्याची घटना चर्हाटा-शिवदरा रोडवर घडली. सोमवारी (दि.11) सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
प्रकाश गायकवाड (रा.अंकुशनगर ता.बीड) असे मयताचे नाव आहे. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह बीड शहराजवळील चर्हाटा-शिवदरा रोडच्या कडेला आढळून आला. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांनी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान या घटनेने बीड परिसरात खळबळ उडाली आहे.
दगडाने ठेचून बीडमध्ये तरुणाची हत्या
