Site icon लोकाशा-बंब न्यूज

वॉटर ग्रिड प्रश्नावर मराठवाडयातले मंत्री गप्प का ? भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांचा सवाल


बीड, भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी मराठवाडयात असलेल्या मंत्र्यावर जोरदार टिका करतांना म्हटले कि .वॉटर ग्रिड सारखी महत्वाची योजना सरकार गुंडाळून ठेवत असतांना मंत्री तोंड का उघडत नाहीत ?असा सवाल त्यांनी केला आहे . शेतकरी सामान्य जनतेसाठी योजणा महत्वाची असताना सरकारने कामाला स्थगिती दिली .मंत्री मराठवाड्याचे सुपुत्र असतांना काहीच. बोलत नाही , कारण त्यांना जनतेच्या प्रश्नापेक्षा सत्तेच्या खुर्चा महत्वाचा वाटतात अस पण त्यांनी म्हटले आहे .
प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की राज्यात मा . श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठवाड्यातील सर्वसामान्य जनतेच्या जीवनातला दुष्काळ कायमचा बाजूला व्‍हावा. लोकांना पिण्याचे मुबलक पाणी मिळावे, शेतीचे सिंचन वाढून आर्थिक समृद्धी शेतकऱ्यांच्या जीवनात यावी. हा उद्देश मनात ठेवून त्यांनी मराठवाड्यासाठी तब्बल 20 हजार कोटी रुपये खर्चाची मराठवाडा वॉटर ग्रीड योजना मंजूर केली होती .त्यापैकी दहा हजार रुपयांची आर्थिक तरतूद तात्काळ केली होती. राज्यात सत्तापरिवर्तन झालं आणि ठाकरे सरकार सत्तेवर येताच योजनेला स्थगिती दिली. जिल्हानिहाय टेंडर निघाले असताना काढू नका म्हणून अशा सूचना सत्ताधाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे मराठवाड्याच्या तोंडी आलेलं पाणी या सरकारने थांबवलं .मात्र गंमत ही वाटते की महाआघाडीच्या मंत्री मंडळात मराठवाड्याचे पाच सुपुत्र आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासारखी ज्येष्ठ मंडळी मंत्रिमंडळात आहे. पण या प्रश्नावर एकही मंत्री तोंड का उघडत नाही ?असा जळजळीत सवाल प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे .मराठवाड्यामधील प्रश्न सोडवायचे नाही आणि खिचपत ठेवायचे असा डाव सरकारचा असून, अतिवृष्टीचे अनुदान सुद्धा सर सगट वाटप केले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे .कदाचित मराठवाड्यातल्या मंत्र्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दम भरला की काय? ज्यामुळे वाटर ग्रिड प्रश्नावर कोणीच बोलत नाही. याचा अर्थ मंत्र्यांना जनतेच्या प्रश्न पेक्षा स्वतःच्या खुर्च्या टिकवणे महत्वाचे वाटते? ही योजना जर मार्गी लागली नाही तर खऱ्या अर्थाने जनतेच्या जीवनातील दुष्काळ आणि पिण्याच्या पाण्याचे दारिद्र्य कधीच संपणार नाही . या प्रश्नावर मंत्र्यांच्या भूमिकेवरच आता उलट सुलट चर्चा असून सर्वसामान्य नाराज आहे .पाच मंत्री मराठवाड्यातून असताना योजना मार्गी लागत नाही ही खऱ्या अर्थाने शोकांतिका असल्याचं राम कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

Exit mobile version