बीड, 25 डीसेंबर भारतरत्न पूर्व पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्ताने शेतकरी व गरीबांच्या कल्याणाकरिता समर्पित प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पीएमकिसान योजनेतून उद्या २५ डिसेंबर २०२० रोजी ९ करोड शेतकरी बंधू-भगिनींच्या खात्यामध्ये १८ हजार करोड रुपये जमा करणार आहेत. या शुभमुहूर्तावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांना ऑनलाईन संबोधित करणार आहेत.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपा प्रदेश उपाध्यक्षा खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी
सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठीक सकाळी ११ वाजता सुशासन दिन साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केले आहे.
उद्या नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे येणार 18 हजार करोड, स्वतः पीएम मोदी शेतकऱ्यांना करणार मार्गदर्शन, खासदार प्रीतमताईंची राहणार उपस्थिती
