Site icon लोकाशा-बंब न्यूज

विवाहीतेचा खून केल्याप्रकरणी पतीस आजन्म कारावासाची शिक्षा, बीड येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांचा निकाल


बीड: आज दि.15/12/2020 रोजी बीड येथील मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय श्री एच . एस . महाजन यांनी फिर्यादीची मुलगी नामे समीना , वय -26 वर्ष हीस तिचा पती नामे अस्लम याकुब शेख , वय -30 वर्ष , रा.गुळज , ता.गेवराई याने जिवे ठार मारल्याप्रकरणी आजन्म कारावास व 25,000 / – रु दंड , दंड न भरल्यास सहा महिने अतिरीक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे . प्रकरणातील थोडक्यात माहिती अशी की , प्रकरणातील फिर्यादी नामे शेख रशीद शेख अब्दुल , रा , दादेवाडी तहत खळेगाव , ता.गेवराई यांची मयत मुलगी समीना , वय -26 वर्ष हीचे सन 2010 मध्ये यातील आरोपी क्रमांक 1 नामे अस्लम याकुब शेख , वय -30 वर्ष , रा.गुळज , ता.गेवराई यांच्याशी रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते . फिर्यादीची मुलगी समीना हीस लग्नानंतर दोन वर्ष सासरच्या लोकांनी व्यवस्थीत नांदविले व नंतर कौंटुबीक व लग्नातील मानपानाच्या कारणावरून शारीरीक व मानसीक त्रास देऊ लागले . याबाबत मयत समीना ही सणावाराला माहेरी आल्यावर होत असलेल्या त्रासाबाबत वडीलांना सांगत असे . परंतू वडील तिची समजूत घालुन नांदावयास पाठवत असत . समीनाने त्रास सहन करून संसार केला त्या दरम्यान दिला चार अपत्येही झाली . परंतू सासरचे लोक समीना हीस तुझ्या माहेरहून घर बांधण्यासाठी दोन लक्ष रुपये घेऊन ये अशी मागणी करून लागले . मागणी पुर्ण होत नाही म्हणुन तीस मानसीक व शारीरीक त्रास देऊन मारहाण करू लागले . दिनांक 17/10/2017 रोजी सकाळी फिर्यादीस फोन द्वारे कळले की , समीना हीचे दुखत असून ती बोलत नाही . असे कळले वरून फिर्यादी व गावातील मित्र मंडळी समिनाच्या सासरी गुळज येथे गेली . समिनाच्या घरात जाऊन पाहिले असता , समिना मृत अवस्थेत आढळून आली . तिचा गळा काळा निळा होऊन सुजलेला दिसून येत होता . तसेच हनुवटीला मारलेले ओळखन दिसून येत होते . सबब फिर्यादीने पोलीस ठाणे चकलांबा येथे गु.र.नं .235 / 2017 कलम 302,498 ( अ ) , 323,506,34 भादंवि अन्वये आरोपी क्रमांक 1 नामे अस्लम याकुब शेख , आरोपी क्रमांक 2 सलाम याकुब शेख , आरोपी क्रमांक 3 आसीफ याकुब शेख , आरोपी क्रमांक 4 याकुब बनेमिया शेख , आरोपी क्रमांक 5 कलीमुन्नीसा ऊर्फ कलीमा याकुब शेख याच्याविरूध्द फिर्याद नोंदविली . प्रकरणांचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एन . एम . शेख यांच्याकडे वर्ग करण्यात आला . तपासीक अधिकारी यांनी आरोपीताविरूध्द सबळ पुरावा गोळा करून मुदतीत दोषारोप पत्र मा . न्यायालयास सादर केले . प्रकरणांची सुनावणी मा.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय श्री एच . एस . महाजन यांच्या न्यायालयात होऊन आज दिनांक 15/12/2020 रोजी अंतीम न्यायनिर्णय पारीत करण्यात आला . मा . न्यायालयाने मयताचा पती आरोपी क्रमांक 1 यास कलम 302 भादंवि अंतर्गत दोषी धरून आजन्म कारावास व 25,000 / – रु दंड , दंड न भरल्यास सहा महिने अतिरीक्त सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे . इतर आरोपीतास मा . न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे . प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू सरकारी वकील बी . एस . राख यांनी मांडली तर पैरवीचे कामकाज सफौ / 1965 सी . एस . इंगळे यांनी पाहिले.

Exit mobile version