Site icon लोकाशा-बंब न्यूज

नगर-बीड-परळी सह 3 रेल्वे मार्गासाठी 250 कोटी :21 हजार 992 कोटींच्या पुरवणी मागण्या


मुंबई, नगर-बीड-परळी, वर्धा-यवतमाळ-नांदेड व नागपूर-नागभीड या रेल्वे मार्गांकरिता 250 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रेल्वे सुरक्षा बांधकामांसाठी 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

पोषण आहार, अंगणवाडी सेविकांच्या मानधनासाठी तरतूद

केंद्र पुरस्पृत एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत पोषण आहारासाठी सुमारे 800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनासाठी 313 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

आरोग्यासाठी तरतूद

आरोग्यासाठी भरीव तरतूद करतानाच जे. जे. रुग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालय इमारतीसाठी 25 कोटींची तरतूद करण्यात आली. आपत्कालीन सेवेतील रुग्णवाहिकांच्या खर्चासाठी 131 कोटींचा निधी, तर रुग्णालयांच्या कार्यालयीन खर्चासाठी 20 कोटींचा अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे.

कोरोनाच्या संकटातून मार्ग काढत राज्याचा गाडा पुढे हाकण्यासाठी राज्य सरकारने 21 हजार 992 कोटींच्या पुरवणी मागण्या आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पटलावर ठेवल्या. पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून राज्यातील रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी सुमारे 2 हजार कोटींची तरतूद करतानाच नैसर्गिक आपत्तीच्या नुकसान भरपाईसाठी 2211 कोटी, तर धान खरेदीसाठी प्रोत्साहन म्हणून 2850 कोटींची तरतूद करीत सरकारने बळीराजाला दिलासा दिला.

Exit mobile version