औरंगाबाद: औरंगाबाद पदवीधर निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतमोजनीला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत 20 हजार मतांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. यात महाविकास आघाडीचे उमेदवार सतिश चव्हाण आघाडीवर आहेत.
या निवडणुकीत झालेल्या २ लाख ४० हजार ७९६ मतांपैकी वैध मते आणि अवैध मते ठरवल्यानंतरच विजयासाठीचा कोटा ठरवण्यात येणार आहे. माञ, अद्याप कोटा न ठरवता मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत 20 हजार मतांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. यात महाविकास आघाडीचे उमेदवार सतिश चव्हाण आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष सिद्धेश्वर मुंडे आहेत. तर, भाजपचे शिरीष बोराळकर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
या निवडणुकीत पोस्टल मतदान एकूण 1 हजार 248 झाले आहेत. यात 175 मते अवैध झाले आहेत. तर, 1 हजार 73 मते वैध ठरले आहे. कलाग्राम मतमोजणी केंद्रावर सध्या मतमोजणीचे काम सुरू आहे. एकूण 56 टेबल लावण्यात आले आहे. एकूण 290 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही मतमोजणी करण्यात येत आहे. त्यात 2 लाख 40 हजार 649 बॅलेट पेपरची मोजणी होणार आहे. एकुण पाच फेऱ्यात ही मत मोजणी होणार आहे. एका फेरीत 56 हजार मतांची मोजणी होणार आहे.