बीड, दि.25 :- बीड पाटबंधारे विभागाकडून आपल्याला न्याय मिळत नसल्याने पाली येथील अर्जुन साळुंके यांनी नैराश्य तुन कार्यालयामध्ये अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याची खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी घडली. जखमी अवस्थेत उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार दिला आहे.
बीड तालुक्यातील पाली येथील अर्जून कुंडलिकराव साळुंके या शेतकर्याची जमीन पाटबंधारे विभागाने संपादीत केलेली आहे. या जमिनीच्या एकत्रीकरणाबाबतचा वाद आहे.गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी पाटबंधारे विभाग कार्यालयाचे उंबरे झिजवत आहे.कार्यालयाकडून न्याय मिळत नसल्याने सदरील शेतकर्याने गेल्या काही महिन्यापूर्वी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.मात्र याची दखल संबंधीत विभागाने घेतली नाही. मंगळवारी दुपारी शेतकर्याने कार्यालयात पेट्रोल ओतून घेत जाळून घेतले. दरम्यान हा शेतकरी 90 टक्के भाजला गेला असल्याचे डॉक्टर यांची सांगितले होते. उपचार दरम्यान त्यांचे मृत्यू झाले परंतु त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी स्पष्ट नकार दिला आहे.