Site icon लोकाशा-बंब न्यूज

शासकीय कापूस खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करा ; खा.प्रितमताईंच्या जिल्हाधिकारी, विभागीय प्रबंधकांना सूचना

बीड.दि.२१——कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्यातील सीसीआयचे कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्याच्या सूचना खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी सीसीआयच्या विभागीय प्रबंधक आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.यंदा अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.अशा परिस्थितीत जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासकीय कापूस खरेदी केंद्रे सुरू करणे आवश्यक आहे.या पार्श्वभूमीवर खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी सीसीआयचे विभागीय प्रबंधक आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून खरेदी केंद्रे सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत.

बीड जिल्ह्यात कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात आल्यामुळे शासकीय खरेदी केंद्रांची संख्या वाढवणे आवश्यक असून बीड जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये देखील तालुकास्तरावर शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावेत अशा सूचना खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केल्या आहेत.सद्यस्थितीत केवळ बीड आणि गेवराई येथील खरेदी केंद्र सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी अडचण येत आहे.यासंदर्भात खा.मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कापूस वेचणीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय खरेदी केंद्रांवर कापूस विकता यावा व त्यांच्या पिकाला योग्य मोबदला मिळावा यासाठी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू होणे आवश्यक असल्याची भावना शेतकरी वर्गामधून व्यक्त करण्यात येत होती.खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी यासंदर्भात संबंधितांना सूचना दिल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून लवकरच जिल्ह्यातील शासकीय कापूस खरेदी केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

•••••

Exit mobile version