Site icon लोकाशा-बंब न्यूज

पंकजाताईंच्या कामाचे आणि खिलाडूवृत्तीचे पवारांकडून कौतूक, शरद पवार म्हणाले ‘पंकजा’ चांगलं काम करताहेत’ तर रोहित पवार म्हणाले ताई, आपल्यातील मनाचा मोठेपणा इतर नेत्यांसाठी शिकण्याजोगा  


 
बीड, दि. 28 (लोकाशा न्यूज) : स्व.गोपीनाथराव मुंडेंनी आपले संपूर्ण आयुष्य गोर-गरिबांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी घातले, गोरगरिबांचा आवाज बनून त्यांनी काम केले, त्यामुळेच स्व.गोपीनाथराव मुंडेंची ओळख लोकनेते अशी झाली, आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पंकजाताईही अगदी साहेबांप्रमाणेच बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करीत आहेत. त्यांच्यातील दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती संपूर्ण महाराष्ट्राने अनेकदा पाहिलेली आहे. ताईंच्या याच खिलाडूवृत्तीने पुन्हा एखदा महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. चांगल्याला चांगल आणि वाईटाला वाईटच म्हणणार्‍या पंकजाताई आहेत. त्याअनुषंगानेच पक्ष जरी वेगळा असला तरी मागच्या दोन दिवसांपुर्वी पंकजाताईंनी थेट शरद पवारांच्या कामाचे कौतूक केेले, ताईंनी कौतुक करून 24 तास होत नाहीत तोच शरद पवारांनीही आता पंकजाताईंच्या कामाचे भरभरून कौतुक केलं आहे. ‘पंकजा या चांगलं काम करत आहेत, असं पवारांनी नाशिकमध्ये म्हटलं आहे. मंगळवारी ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नावर बैठक असल्याने त्या पुण्यातल्या बैठकीत हजर होत्या. त्यांचं या विषयात काम आहे आणि त्या चांगलं काम करत आहेत असेही पवारांनी म्हटलं आहे. शरद पवारांपुर्वी आ. रोहित पवारांनीही पंकजाताईंचं भरभरून कौतूक केलं आहे.
भाजपमधून एकनाथ खडसे नुकतेच राष्ट्रवादीमध्ये गेले आहेत. खडसे हे भाजपमध्ये नाराज होते. खडसेंनी पक्ष सोडल्यामुळे भाजपमधील षढयंत्री लोकांच्या पायाखालची माती आता सरकली आहे. खडसेंची पोकळी पंकजाताई ह्याच भरून काढू शकतात, कारण त्या एक मास लिडर आहेत. त्यांची ताकत संपूर्ण महाराष्ट्रात आहे, त्यांच्या एका आवाजावर महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी मोठी गर्दी जमा होवू शकते, तसेच त्यांच्या एका आवाजावर कोणत्याही निवडणूकीत उलथा पालथ होवू शकते, हे भाजपच्या आणि विरोधी पक्षातील नेत्यांनाही चांगलेच माहित आहे. नुकतीच भाजपने पंकजाताईंवर राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपविली आहे. याही पदाचे त्या सोनेच करणार आहेत, असा विश्‍वास संपूर्ण महाराष्ट्राला आहे. स्वत: तर चांगलं कामचं करतात मात्र पंकजाताई इतरांच्याही चांगल्या कामाचे  नेहमीच कौतूकही करतात, त्यांच्या मनात थोडाही खुनशीपणा नाही, त्या मुंडे साहेबांप्रमाणेच एक दिलदार आणि खिलाडूवृत्तीच्या नेत्या आहेत.   त्यांच्यातील खिलाडूवृत्ती अनेदा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे. याचे सातत्याने कौतूकही होत आहे. मंगळवारी पंकजाताई या ऊसतोडणी कामगारांच्या बैठकीला उपस्थित होत्या. त्या बैठकीला शरद पवारही उपस्थित होते. त्यानंतर रात्री उशीरा पंकजाताईंनी एक ट्विट करत शरद पवारांच्या कामाचं कौतुक केलं होतं. पवार साहेब, हॅटस् ऑफ कोरोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले. पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले, तरी कष्ट करणार्‍या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे,असे ट्वीट ताईंनी केले होते. यावर बुधवारी ट्वीट करत आ. रोहित पवार यांनी पंकजाताईंच्या दिलदारपणाचे कौतुक केले आहे. धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणार्‍यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा, असे म्हटले होते, रोहित पवारांनंतर शरद पवारांनीही आता पंकजाताईंच्या कामाचे कौतूक केले आहे. ‘पंकजा, या चांगलं काम करत आहेत, असं पवारांनी नाशिकमध्ये म्हटलं आहे. मंगळवारी ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नावर बैठक असल्याने त्या पुण्यातल्या बैठकीत हजर होत्या. त्यांचं या विषयात काम आहे आणि त्या चांगलं काम करत आहेत असेही पवारांनी म्हटलं आहे. यापुर्वी पंकजाताई मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कामाचेंही भरभरून कौतूक केलेले आहे, तसेच आज धनंजय मुंडे हे राजकिय विरोधक असले तरी यापुर्वी पंकजाताईंनी धनंजय मुंडेंना पुरस्कार मिळाल्यानंतर शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच कोरोनाची लागण झाल्यानंतरही ताईंनी धनंजय मुंडेंना थेट फोन करून स्वत:ची आणि कुटूंबाची काळजी घ्या, असे सांगत आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून दिलेला आहे. त्यांचा हाच मोठेपणा पावलोपावली त्यांच्या कामी येणार आहे.  

Exit mobile version