Site icon लोकाशा-बंब न्यूज

जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरुन होणाऱ्या आरोपांना अजित पवारांनी दिलं उत्तर

मुंबई, दि. १६ (लोकाशा न्यूज) : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेतील गैरकारभाराबाबत ‘कॅग’ने ताशेरे ओढल्यानंतर आता या योजनेची चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. देवेंद्र फडणवीस यांना हा मोठा धक्का मानला जातो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून सूडबुद्दीने किंवा मुद्दामून कोण कऱणार आहे? अशी विचारणा केली आहे. पुण्यात अजित पवारांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
अजित पवार यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरुन होणाऱ्या आरोपांना उत्तर देत म्हटलं की, “हे जाणुनबुजून करत नाही. कॅगच्या अहवाल दोन दिवसांच्या अधिवेशनात सादर करण्यात आला होता. कॅगच्या अहवालावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. तशा पद्धतीच्या सूचना गेल्या आहेत”.
“सूडबुद्दीने किंवा मुद्दामून कोण कऱणार आहे? कॅगचा अहवाल कोणाच्या काळात आला? कारण नसताना राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये. आम्ही विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं तेव्हा जलसंधारण खातं ज्यांच्याकडे होतं त्या तानाजी सावंत यांनी विधानपरिषेदत भ्रष्टाचार झाल्याचं सांगितलं होतं….त्यांनीच तसंच सूतोवाच केलं होतं,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

Exit mobile version