बीड, दि. 13 :- जिल्हाधिकारी बीड यांच्या वैयक्तीक ई-मेल आयडीचा गैरवापर करुन ंपाटोदा तहसिल कार्यालयाला खोटा मेल पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात पाटोदा तहसिलदारांच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम 66 (क) (ड) आयटी अॅक्टसह कलम 419 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
बीड येथील जिल्हाधिकारी यांच्या वैयक्तीक ई-मेल आयडीचा गैरवापर करुन अज्ञात व्यक्तीने दि.24 सप्टेंबर 2020 ंरोजी पाटोदा तहसिल कार्यालयाच्या मेल आयडीवर एक ई-मेल पाठवला होता. या मॅसेजच्या खाली फ्रॉम राहूल रेखावार (आयएएस कलेक्टर अॅण्ड डिस्ट्रीक मॅजिस्ट्रेट) अशा मजकुराचा ई-मेल पाठवला होता. पाटोदा तहसिलदार यांनी सदर ई-मेल बाबत खात्री केली असता तो ई-मेल कोणीतही अज्ञात इसमाने जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी बीड यांच्या वैयक्तीक ई-मेल आयडीचा गैरवापर करुन पाठवल्याचे समोर आले या प्रकरणात आरोपीच्या नावाची खात्री करण्याचा प्रयत्न झाला. मात्र संबंधित व्यक्तीचे नाव समोर आले नाही. अखेर काल पाटोद्याचे तहसिलदार रमेश मुंडलोड यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध पाटोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पोनि.माने करीत आहेत.