बीड, दि. ३ (लोकाशा न्यूज) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अटल बोगद्याचं उद्धाटन करण्यात आलं असून आज फक्त माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचं स्वप्न पूर्ण झालेलं नाही, तर हिमालच प्रदेशातील करोडो लोकांचाही गेल्या कित्येक दशकांची प्रतिक्षा संपली आहे असे कौतुगोद्गार त्यांनी काढले. या बोगद्यामुळे मनाली आणि केलॉन्गमधील अंतर तीन ते चार तासांनी कमी होईल असंही त्यांनी सांगितलं.
हिमाचल प्रदेशमध्ये मनाली-लेह मार्गावर उभारण्यात आलेला ९.०२ किमी लांबीच्या ‘अटल टनल रोहतांग’ या बोगद्याचे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालं. भारताच्या युद्धनीती विषयक धोरणांमध्ये हा बोगदा महत्वाचा भाग ठरणार आहे. हा जगातील सर्वात मोठा बोगदा आहे. यामुळे भारतीय लष्कराला पाकिस्तान आणि चीन सीमेपर्यंत सहज प्रवेश करता येणार आहे.