Site icon लोकाशा-बंब न्यूज

बाबरी प्रकरणी अंतिम निकाल वाचनाला सुरुवात

नवी दिल्ली : बाबरी खटल्यावर सीबीआय(CBI) चे विशेष न्यायालय आज (बुधवारी 30 सप्टेंबर) निकाल देणार आहे. या खटल्यात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार, कल्याण सिंह यांसारख्या मोठ्या राजकीय व्यक्तींसह एकूण 32 जण आरोपी आहेत. लखनौमधील कोर्टात या निकाल वाचनाला सुरुवात झाली आहे. या निकालाकडे संपूर्ण देशवासियांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

Exit mobile version