Site icon लोकाशा-बंब न्यूज

लोखंडी सावरगावच्या रूग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांच्या पगाराचा प्रश्‍न तात्काळ मार्गी लावा


मुंबई, दि. 29 (लोकाशा न्यूज) : सर्व सामान्य नागरिकांचा प्रश्‍न छोटा असो की मोठा तो तत्परतेने मुंदडा कुटूंबिय सोडवितात, हे संपूर्ण जिल्हवासियांनी पाहिले आहे, स्व.विमलताई मुंदडा यांनी तर बीड जिल्ह्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्यात बर्‍याच विकास कामांना गती मिळाली, अनेक महत्वाचे प्रकल्प मार्गी लागले, आज त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, आ. नमिताताई मुंदडा आणि युवा नेते अक्षय मुंदडा हे धडाडीने काम करीत आहेत. मंगळवारी अक्षय भैय्यांनी आरोग्य मंत्र्यांकडे लोखंडी सावरगाव येथील रूग्णलयातील डॉक्टरांसह परिचारिकांच्या रखडलेल्या पगाराचा प्रश्‍न मांडला, त्यांच्या या प्रश्‍नाची आरोग्य मंत्र्यांनी तात्काळ दखल घेतली, सदर डॉक्टर आणि परिचारिकांच्या पगाराचा प्रश्‍न तात्काळ मार्गी लावावा, असे आदेश आरोग्य मंत्र्यांनी लातूरचे आरोग्य उपसंचालक आणि जिल्हा शल्यचिकीत्सकांना दिले आहेत. अक्षय भैय्यांनी केलेल्या या मागणीचे संबंधित डॉक्टर आणि परिचारिकांमधून कौतूक केले जात आहे.
लोखंडी सावरगाव येथील स्त्री रुग्णालय जेथे सद्या कोविड केअर सेंटर असलेल्या रुग्णालयातील 11 डॉक्टर्स, 11 परिचारिका यांचा गेल्या 1 वर्षा पासून पगार नाही व त्यांनी 1 ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन व उपोषण करण्याचे सांगितले होते, सद्या कोरोना परिस्थितीमध्ये हे रुग्ण सेवेवर या गोष्टी मुळे परिणाम होऊ ने व ज्यांना पगार मिळाला नाही ते पण कौटुंबिक आर्थिक अडचणीतून सामोरे जात आहेत. लवकरात लवकर त्यांना पगार मिळावा या करिता मंगळवारी अक्षय मुंदडा यांनी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली व त्यांनी उपसंचालक लातूर, व जिल्हा शलयचिकित्सक बीड यांना हा विषय तात्काळ मार्गी लावण्यासाठी सूचना दिल्या. दरम्यान अक्षय भैय्या यांनी केलेल्या मागणी संदर्भातच आ. नमिता मुंदडा यांनी एक लेखी पत्रही आरोग्य मंत्र्यांना दिले आहे.

Exit mobile version