Site icon लोकाशा-बंब न्यूज

कंकालेश्वर कुंडात आढळलेल्या मृतदेहाची अखेर ओळख पटली


बीड, दि.12 (लोकाशा न्यूज) : मयत बाळासाहेब विनायकराव ढेरे (वय 40, रा. धांडे गल्ली बीड) हे रविवारी साडेआठच्या सुमारास मृत अवस्थेत कंकालेश्वर मंदिराच्या कुंडात आढळून आले होते. या घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक विश्वास पाटील सह पोलीस हेडकॉन्स्टेबल खाडे, पोलीस नाईक अन्सार मोमीन, सचिन क्षीरसागर, सिराज पठाण, यांनी घटनास्थळी धाव घेत पाच तासात ओळख पटवली असून आत्महत्या की अपघात समजू शकले नाही. मयत हे मसोबा फाटा येथील डी फार्मसी कॉलेजवर टेक्निशन म्हणून कार्यरत होते.

Exit mobile version