Site icon लोकाशा-बंब न्यूज

चित्रपटगृहे सुरु करणारे देशातील हे राज्य ठरलं पहिलं

पश्चिम बंगाल : करोना महामारीमुळे पाच महिन्यापासून देशभरातील चित्रपटगृहे बंद आहेत. देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. करोनाच्या या संकाटामध्येही पश्चिम बंगालमध्ये एक ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. शनिवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय घेतला आहे. ट्विट करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “सामन्य परिस्थितीकडे जाताना, नाटक (प्ले), ओएटी, चित्रपटगृह, म्युझिकल व नृत्य कार्यक्रम आणि मॅजिक शोला एक ऑक्टोबर पासून परवानगी देण्यात येत आहे. पण या सर्व ठिकाणी ५० पेक्षा कमी जणांची उपस्थिती असायला हवी. यादरम्यान सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचे (सामाजिक अंतर) पालन करायला हवं. शिवाय मास्क आणि इतर नियमांचेही पालन करावे.” असे म्हणटलं आहे. करोना महामारीमुळे पाच महिन्यापासून देशभरातील चित्रपटगृहे बंद आहेत. करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाउन घेण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाउनमध्ये शिथिलता आणली आहे. अनेक गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र देशात चित्रपटगृहांना सुरु करण्याची अद्याप परवानगी देण्यात आली नाही. चित्रपटगृहे सुरु करणारे पश्चिम बंगाल देशातील पहिलं राज्य ठरले आहे.

Exit mobile version