‘सदैव सोबत तुमचा आशिर्वाद, कधीही व्यर्थ गेली नाही माझी साद’, भगवान बाबांचे दर्शन घेताना पंकजाताईंनी शेअर केला फोटो
Lokasha Abhijeet
बीड, दि. 26 : महाराष्ट्राच्या मासलिडर म्हणून पंकजाताईंची खरी ओळख आहे, राज्यातील मोठा जनाधार त्यांच्या पाठीशी आहे, हे सगळं लक्षात घेवूनच भाजपने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे, राष्ट्रीय सचिव पदी त्यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर परळी, बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते फटाके फोडून पंकजाताईंच्या या निवडीचे स्वागत करत आहेत. तर या निवडीनंतर पंकजाताईंनी पक्ष वाढीसाठी ताकतीने काम करणार असल्याचे सांगितले आहे. तर रात्री उशीरा त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत भगवान बाबांचे दर्शन घेताना एक फोटोही फेसबुकवर शेअर केला आहे. ‘सदैव सोबत तुमचा आशिर्वाद, कधीही व्यर्थ गेली नाही माझी साद’ असे तो फोटो शेअर करून ताईंनी म्हटले आहे.