Site icon लोकाशा-बंब न्यूज

अविनाश खापेचा बोलवता धनीच भाजपेयीं आहे -आमटे

बीड, दि. 25 (लोकाशा न्यूज):- काही लोकांना आकाशाकडे पाहून थुंकण्याची सवय असते , मात्र आकाशाकडे तोंड असणाऱ्या लोकांच्या तोंडावरच ते येऊन पडणार असते अशीच गत शिवसंग्राम या संघटनेतून कार्यमुक्त केलेल्या अविनाश खापे यांची असल्याचे पत्रकातून राजेंद्र आमटे यांनी म्हटले आहे , भाजप आणि आ विनायक मेटे यांच्या संदर्भात बोलण्या पूर्वी भाजपच्या जिल्हा कचेरीत थाप घेणाऱ्या अविनाश खापे यांनी स्वतः काय करतात याचा विचार करावा असे आमटे यांनि म्हटलं आहे . आ विनायक मेटे यांच्या उंचीला व संघर्षांची साक्ष उभा महाराष्ट्र देतो मात्र गदार मानसिकतेने निष्ठेच्या उलट्या करू नयेत नाहीतर शिवसंग्राम संघटनेणें अश्या फितुऱ्या भिरकावल्या आहेत हा इतिहास कुणी विसरू शकत नाही . ज्यांनी ओळख दिली त्यांचे पाय ओढणाऱ्या टोळक्यात जाऊन हबुक ठोकणारी नामर्द मानसिकतेचा आपण निषेध करत असल्याचे राजेंद्र आमटे यांनी म्हटले आहे

Exit mobile version