Site icon लोकाशा-बंब न्यूज

ऑक्टोबरपासून सुरु होणार मेड इन इंडिया ‘कोव्हॅक्सीन’ची तिसऱ्या फेजची चाचणी


दिल्ली, दि. २५ (लोकाशा न्यूज) : करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारत बायोटेकने विकसित केलेल्या स्वदेशी ‘कोव्हॅक्सीन’ लशीची तिसऱ्या फेजची चाचणी लवकरच सुरु होणार आहे. ऑक्टोबर महिन्यापासून लखनऊ आणि गोरखपूरमध्ये ‘कोव्हॅक्सीन’ची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु होणार असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने गुरुवारी जाहीर केले. “ऑक्टोबर महिन्यापासून लखनऊ, गोरखपूरमध्ये भारत बायोटेकने विकसित केलेल्या ‘कोव्हॅक्सी’न लशीची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु होईल” अशी माहिती उत्तर प्रदेशचे प्रधान आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

Exit mobile version