Site icon लोकाशा-बंब न्यूज

‘या’ चुकीमुळे विराट कोहलीला भरावा लागणार 12 लाखांचा दंड!

दुबई | किंग्ज इलेव्हेन पंबाजने रॉयल चॅलेंजर बंगळूरूचा दारूण पराभव केला. कर्णधार विराट कोहलीच्या हातातून सामना तर गेलाच मात्र त्याचसोबत त्याला 12 लाखांचा दंडही भरावा लागणार आहे.

टॉस जिंकून फिल्डींग करताना स्लो ओव्हर टाकल्याप्रकरणी कोहलीला हा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर बंगळूरूच्या टीमची ही पहिलीच चूक होती.

पहिली चूक असल्याने कोहलीला केवळ 12 लाखांचा दंड ठोठवण्यात आलाय. या मॅचनंतर कोहलीने पराभवाची जबाबदारी देखील स्वतःची असल्याचं कबूल केलं.

Exit mobile version