दिल्ली, दि. २४ (लोकाशा न्यूज) : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्या नंतर मराठा समाज आक्रमक झाला असुन मराठा समाज थेट दिल्लीत पोहचला असुन आज दिल्लीतील जंतर मंतर मैदान याठिकाणी मराठा आरक्षणासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान व राष्ट्रपती यांना निवेदने देण्यात आली. कोव्हीडमूळे फक्त पाच सहा जणांचा आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती.यावेळी एक मराठा लाख मराठाचा नारा दिल्लीत घुमला. राष्ट्रीय छावा संघटनेच्या वतिने हे आंदोलन करण्यात आले.