दिल्ली, 24 सप्टेंबर : बीड येथील प्राप्तीकर विभागाच्या कार्यालयाचे कामकाज अंशतः औरंगाबाद तसेच जालना येथील कार्यालयाकडे वर्ग केल्यामुळे जिल्ह्यातील व्यापारी व करदात्या नागरीकांची गैरसोय होत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर काल खा. प्रीतमताई मुंडे यांनी यासंदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री श्री.अनुरागजी ठाकूर यांची दिल्ली येथे भेट घेतली.
जिल्ह्यातील नागरीकांना आर्थिक व व्यावसायिकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या कामांनिमित्त औरंगाबाद किंवा जालन्याला जाने गैरसोयीचे व वेळेचा अपव्यय करणारे असल्याची भूमिका यावेळी मांडली.तसेच जिल्ह्यातील व्यापारी व नागरीकांच्या दृष्टीने सोयीचे असलेले बीडचे प्राप्तीकर कार्यालय आणि कार्यालयाचे कामकाज पूर्ववत सुरू ठेवून नागरीकांची होणारी गैरसोय रोखण्याची विनंती केली. यावेळी मा.मंत्री श्री.अनुराग ठाकूर यांनी ताईंच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन नागरीकांची गैरसोय दूर करण्याचे आश्वासन दिले आहे.